पुणे : राज्यातील कामकाज होत नसलेल्या, बंद झालेल्या अशा केवळ कागदावर अस्तित्व असलेल्या सहकारी संस्था अवसायनात काढण्यात येणार आहेत. त्याकरिता सहकार आयुक्तालयाकडून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली असून अशा संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले आहेत.      

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात एक लाख ९८ हजार ७८६ सहकारी संस्था नोंदणीकृत आहेत. नोंदणीकृत संस्थेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्या खालील महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१, तसेच संस्थेच्या उपविधीतील तरतुदीनुसार कामकाज करणे आवश्यक आहे. मात्र त्यानुसार राज्यातील काही सहकारी संस्था काम करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व उपनिबंधक, सहायक निबंधकांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गृहनिर्माण वगळून सर्व संस्थांचा सर्वेक्षणाचा कार्यक्रम १५ डिसेंबर २०२२ पर्यंत खास मोहिमेद्वारे राबविण्यास सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणासाठीचा कालावधी निश्चित करण्यात आला असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.      

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cooperative commissionerate cooperative societies registration cancelled zws
First published on: 20-09-2022 at 02:14 IST