कर्तव्य पार पाडताना माणुसकी जपत करोना प्रतिबंधासाठी पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे पुणे पोलिसांप्रती नागरिकांचा आदर वाढला आहे. सीमेवरील जवानांप्रमाणेच राज्य पोलिसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे आणि राज्य पोलिसांच्या कामगिरीचा गौरव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने लॉकडाऊन कालावधीत करोना नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. तसेच पुणे शहर पोलीस कर्मचारी बॅच 2012 च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला अजित पवार यांनी भेट देऊन पोलीसांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी हे गौरवोद्‌गार काढले.

लॉकडाऊन कालावधीतील पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीची माहिती देणाऱ्या फलकाची पाहणीही उपमुख्यमंत्र्यांनी केली. करोनाच्या संकटाचा धैर्याने सामना करीत उत्कृष्ट जनसेवा केल्याबद्दल अजित पवार यांनी पुणे पोलिसांच्या कामाचे विशेष कौतुक केले. कर्तव्य बजावत असताना स्वच्छता, सुरक्षिततेची काळजी घ्या, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, सॅनिटायझरचा वापर करा आदी सूचना त्यांनी केल्या. यावेळी ‘फील द बिट’ पुस्तिकेचे प्रकाशनही अजित पवारांच्या हस्ते करण्यात आले.

अजित पवार यांनी यावेळी पोलिसांचे विशेष कौतुक करताना सांगितले की, “गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील पोलिसांनी संवेदनशीलता दाखवत करोना नियंत्रणासाठी निरंतर काम करुन पोलीस विभागाची प्रतिमा उंचावली आहे. यापुढच्या काळातही सर्वांच्या एकजुटीतून करोनाला राज्यासह देशातून हद्दपार करण्याचा निर्धार करुया”.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus lockdown deputy cm ajit pawar on maharashtra police sgy
First published on: 12-06-2020 at 18:43 IST