लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात बेकायदा रॅपगीत चित्रीकरण केल्या प्रकरणी एका तरुणाच्या विरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या रॅपगीतात तरुणाने तलवार, रिव्हॅाल्वर तसेच अश्लील शब्दांचा वापर केल्याचे उघडकीस आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला होता.

शुभम आनंद जाधव (वय २४, रा. भगवती आशियाना सोसायटी, जयभवानीनगर, पाषाण) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. विद्यापीठ सुरक्षा विभागाचे सहायक अधिकारी सुधीर दळवी (वय ५०) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विद्यापीठाच्या आवारात जाधव याने बेकायदा रॅप गीत चित्रीत केले होते. रॅप गीतात अश्लील शब्द होते. संबंधित रॅप गीताची ध्वनीचित्रफित ‘रॉकसन सल्तनत’ या नावाने समाजमाध्यमावर १८ मार्च रोजी प्रसारित करण्यात आली होती.

आणखी वाचा- पुणे: अंदमान-निकोबार सहलीसाठी पैसे घेऊन १५ जणांची फसवणूक; पर्यटन कंपनीच्या संचालकांवर गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यापीठाच्या आवारात बेकायदा चित्रीकरण, अश्लील शब्दांचा वापर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दळवी यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर या प्रकरणी रॅपगीत गायक शुभम जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण तपास करत आहेत.