माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सलील अंकोला यांची पत्नी परिणिती अंकोला (वय- ४६, रा. गीता सोसायटी, सॅलिसबरी पार्क) यांनी रविवारी सायंकाळी राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
परिणिती आणि सलील अंकोला यांचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर परिणिती आपल्या आईसोबत सॅलिसबरी पार्क येथे राहत होत्या. रविवारी दुपारी परिणिती यांच्या घरची मंडळी बाहेर गेली होती. रात्री ८ वाजता परतल्यानंतर परिणिती यांनी ओढणीने गळफास लावून घेतल्याचे उघडकीस आले. त्यांच्या मृतदेहाजवळ आत्महत्येबाबत कोणतीही चिठ्ठी न मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.