केंद्रीय विद्यापीठांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी ) जुलैच्या अखेरच्या आठवड्यात होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांना १८ जूनपर्यंतच्या मुदतीत राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाच्या (एनटीए) संकेतस्थळावरून अर्ज भरता येईल. या परीक्षेमार्फत देशभरातील ४२ केंद्रीय विद्यापीठांसाठीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. जगदेशकुमार यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. केंद्रीय विद्यापीठांतील प्रवेशांसाठी सीयूईटी आयोजित करण्याची घोषणा यूजीसीकडून नुकतीच करण्यात आली. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२३साठी एनटीएकडून केंद्रीय विद्यापीठांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीयूईटीची प्रक्रिया राबवली जाईल. एनटीएच्या cuet.nta.nic.in या संकेतस्थळावर सीयूईटीमध्ये सहभागी केंद्रीय विद्यापीठांची यादी आणि अन्य तपशील उपलब्ध करण्यात आल्याचे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीयूईटीमध्ये सहभागी झालेल्या देशभरातील केंद्रीय विद्यापीठातील प्रवेशासाठीची संधी विद्यार्थ्यांना एकाच परीक्षेद्वारे मिळेल. पदव्युत्तर प्रवेशासाठी होणारी सीयूईटी ही संगणकावर आधारित परीक्षा (सीबीटी) या पद्धतीने होणार असल्याचे प्रा. जगदेशकुमार यांनी नमूद केले आहे.