पुणे : शहरात रात्री अकरानंतर संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.
शहरातील दुकाने रात्री आठ तसेच उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. सोमवारी (९ ऑगस्ट) रात्री अकरानंतर शहरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत रात्री अकरा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदीचे आदेश कायम राहणार आहेत.
शहरातील र्निबध शिथिल करण्यात आले असले तरी, जमावबंदीचे आदेश लागू आहेत. जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्यात येईल, असे सहपोलीस आयुक्त डॉ. शिसवे यांनी कळविले आहे.