परिवर्तन संस्थेतर्फे राबविण्यात आलेल्या सायकल अभियानांतर्गत पुणेकरांकडून जमा केलेल्या जुन्या सायकलींची दुरुस्ती करून वेल्हे तालुक्यातील पासली या दुर्गम गावातील राजगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये २१ विद्यार्थ्यांना सायकली भेट देण्यात आल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका यू. एम. कोंडेकर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे विश्वस्त अभिजित घुले, धीरज टिळेकर, जीवन जाधव, शशिकांत देवकर या प्रसंगी उपस्थित होते. सायकल मिळालेल्या विद्यार्थ्यांनी संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या अभियानामुळे विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्या-येण्याच्या वेळेत बचत होणार आहे. नागरिकांनी सायकल देण्यासाठी अभिजित घुले यांच्याशी ९८२२४७५०७४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.