पुण्यातील कोंढवा भागातील एका दिवसाचे बाळ कचऱ्यात टाकून देण्यात आले. मात्र या बाळाचे प्राण दामिनी पथकाने वाचविले असून या कामगिरीमुळे स्थानिकांकडून पोलिसांचे विशेष कौतुक केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील ज्योती हॉटेलसमोरील महफील इलिगीझा सोसायटी समोरील कचऱ्यात एक बाळ आढळले. ते पाहण्यासाठी नागरिक जमले होते. त्यावेळी तेथून पेट्रोलिंग करिता जात असताना दामिनी पथकाच्या मार्शल रुपाली शिंदे आणि धनश्री गवस या दोघींनी  घडलेला प्रकार पाहिला. त्यांनी त्या एक दिवसाच्या बाळाला घेऊन तेथून तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आता बाळाची तब्येत उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बाळाला त्या ठिकाणी कोणी टाकून गेले आहे. याबाबतचा तपास परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून करत करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Damini pathak save baby in the trash
First published on: 19-06-2019 at 22:01 IST