हडपसर भागातील महादेवनगर येथील रस्त्याच्या बाजूला मृत अवस्थेत अर्भक आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० च्या सुमारास पोलिसांना महादेवनगर येथील रस्त्याच्या बाजूला मृत अवस्थेत एक अर्भक असल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली असता ते अर्भक मृत असल्याचे आढळून आले. हे अर्भक साधारण तीन दिवसांचे असल्याचा अंदाज असून पोलिसांनी या प्रकरणी परिसरात चौकशी सुरू केली आहे. हडपसर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.