रोजगारासाठी इंग्रजी आवश्यक असली तरी त्यासाठी आपल्या मातृभाषेचा बळी देणे कदापिही मान्य नाही. मराठी भाषेच्या खच्चीकरणामुळे सांस्कृतिक दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. साक्षरता वाढत असली तरी वाचकांची संख्या रोडावत चालली आहे. महाराष्ट्रातील वाङ्मयीन व्यवहार कमी होत जाणे, ही चिंतेची बाब आहे, अशी खंत ज्येष्ठ समीक्षक डाॅ. सुधीर रसाळ यांनी शनिवारी व्यक्त केली.

हेही वाचा >>>पुणे: धायरीत हॉटेल व्यवस्थापकचा खून; पोलिसांकडून शोध सुरु

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते डाॅ. सुधीर रसाळ यांना ‘डाॅ. निर्मलकुमार फडकुले जीवनगाैरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी रसाळ बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे आणि सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे, फेस्काॅमचे अध्यक्ष अरुण रोडे, संस्कृती प्रकाशनाच्या सुनीताराजे पवार, डाॅ. तुकाराम रोंगटे आणि डाॅ. नारायण भोसले यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यासाठी प्राचार्य बाजीराव गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

हेही वाचा >>>नगर रस्ता परिसरात १४ लाखांचा गुटखा जप्त; गुटखा वाहतूक करणारा टेम्पो चालक अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. रसाळ म्हणाले,की भाषेच्या माध्यमातून संस्कृतीचे जतन होत असते. त्यामुळे मातृभाषेवर प्रेम करून तिचा व्यवहारात अधिकाधिक वापर केला पाहिजे, अन्यथा आपणच आपल्या संस्कृतीचे गुन्हेगार ठरू. विचारांची शुद्धता ठेवून लालित्यपूर्ण भाषेत मांडणी ही डॉ. निर्मलकुमार फडकुले यांची हातोटी होती.