भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांची भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले वस्तु संग्रालय येथे येऊन भेट घेतली आणि तब्येती बाबत विचारपूस देखील केली.तर मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील गिरीश बापट यांची भेट घेतली होती.
त्या भेटीनंतर कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकी बाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील काही दिवसापूर्वी गिरीश बापट यांची भेट घेतील होती.मागील भेटीपेक्षा आताची तब्येत आधिक चांगली वाटली.या गोष्टीचा मला आनंद आहे.तसेच कसबा पोटनिवडणुकीची त्यांना काळजी आहे.प्रकृतीच्या कारणास्तव ते प्रचारामध्ये येऊ शकत नसले.तरी देखील त्यांनी मला काही टिप्स दिल्या आहेत. त्याच बरोबर आजारी असून देखील त्यांच या निवडणुकीकडे बारिक लक्ष आहे.या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप नीट पध्दतीने विजयी होईल.असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.
तसेच ते पुढे म्हणाले की, या निवडणुकी करता अमित शाह काही येत नाही.शिवसृष्टीच्या पहिल्या लोकार्पण सोहोळ्यास येत आहे.त्याच दरम्यान त्यांचे अनेक कार्यक्रम असून ते निवडणुकीच्या प्रचारात कुठे ही सहभागी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.मनसेवर यापूर्वी तुम्ही टीका केली होती. तरी देखील कसबा मतदारसंघात तुम्हाला मनसेच्या मदतीची गरज पडली आहे.त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की,निवडणुकीमध्ये सर्वांची मदत घ्यावी लागते.मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे.आता ते हिंदुत्ववादी ब्रेकयेटमध्ये येतात.त्या ब्रेकयेटमध्ये येणारे आम्हाला सर्व चालतात. अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली. बीबीसी वृत्तवाहिनी आणि संकेतस्थळाच्या दिल्ली, मुंबईमधील कार्यालयांमध्ये प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्याची घटना घडली.त्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून आंदोलन करित आहे.त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की,तुम्ही किती ही खोटे मत तयार करण्याचा प्रयत्न केला.तरी देखील लोकांचा नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे.अशी भूमिका अमित शाह यांनी मांडली आहे.तसेच २०२२ पासून नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न काही नेत्याकडून तरी काही माध्यम समूहाकडून झाला आहे.त्यातून अधिक तेजाने मोदी जी बाहेर पडल असल्याचे त्यांनी सांगितले.