c

गणेशोत्सवातील रोषणाई, दिमाखदार मिरवणुकीवर होणारा खर्च टाळून लष्कर भागातील श्री शिवराम तरुण मंडळाने उत्सवाच्या कालावधीत दहा दिवस गरजूंना दहा दिवस अन्नदान तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. गेले बारा वर्षे पूर्व भागातील या मंडळाचे अध्यक्षपद आसिफ हरुन शेख भूषवित असून उत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी विविध उपक्रम या मंडळाकडून सातत्याने राबविण्यात येण्यात येत आहेत.
लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावर श्री शिवराम तरुण मंडळ आहे.

या मंडळाची स्थापना १९७० मध्ये करण्यात आली. मंडळाचे यंदा ५२ वे वर्ष आहे. लष्कर भागातील मुस्लीम, ख्रिश्चन धर्मीय मोठ्या संख्येने राहायला आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून मंडळाकडून वर्षभर अनेकविध उपक्रम राबविण्यात येत असून सर्व धर्मीय कार्यकर्त्यांचा उत्सवात सहभाग असतो. गेले बारा वर्ष या मंडळाचे अध्यक्षपद आसिफ हरुन शेख भूषवित आहेत. मंडळाकडून वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. गेले बारा वर्ष मी शिवराम तरुण मंडळाचा अध्यक्ष आहे. मंडळाच्या माध्यमातून काम करताना माझ्यातील कार्यकर्ता घडला. जातधर्माच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मला गणेशोत्सवाच्या माध्यमातून मिळाली, असे आसिफ शेख यांनी नमूद केले.

हेही वाचा : पुणे : हवेलीतील दस्त नोंदणी पूर्ववत करावी ; चंद्रकांत पाटील यांची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणेशोत्सवात देखावे, मिरवणुकीवर खर्च होतो. हा खर्च टाळून उत्सवाच्या काळात मंडळ गेले २६ वर्ष लष्कर भागातील गरजूंना अन्नदानाचा उपक्रम राबवित आहे. अन्नदानासह उत्सवाच्या काळात मंडळाकडून विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. गणेशोत्सवाने मला घडवले तसेच कार्यकर्ता म्हणून ओळख मिळवून दिली. उत्सवापुरते मर्यादित न राहता वर्षभर सामाजिक उपक्रम राबविण्याचा पायंडा मंडळाने पाडला असून उत्सवाच्या माध्यमातून जनसेवा हे मंडळाचे उद्दिष्ट आहे, असे शेख यांनी नमूद केले.सुरेश राजगे, रमेश विचारे, राजेश देशपांडे, ॲड. राहिल मलीक, सुनील मोरे, शेल्डन फर्नांडिस, नीलेश शर्मा, तेजस रासगे आदी मंडळांचे प्रमुख कार्यकर्ते आहेत.