पुणे : मराठी भाषेसाठी दिलेले लक्षणीय योगदान आणि कार्याबद्दल राज्य शासनाने सुरू केलेला ज्येष्ठ भाषावैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक डॉ. अशोक केळकर यांच्या नावाने देण्यात येणारा मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेला जाहीर झाला आहे.

दोन लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. मराठी भाषा गौरवदिनी २७ फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

India to get above normal rain
दिलासा; यंदा उत्तम पावसाचा अंदाज
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
Aditya Thackeray Yavatmal
‘वापरा आणि फेका’ हीच भापजची नीती; महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांची टीका

हेही वाचा – पुणे : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

हेही वाचा – पुणे : तीन वर्षांच्या वेदांशीचे परदेशात शिवस्तुतीपर पोवाडे गायन; लहान वयात कविता, पोवाडा गाण्याचा विक्रम

प्रा. जोशी म्हणाले, परिषदेने आजवर केलेल्या कामाची दखल घेतली गेली याचे समाधान वाटते. परिषदेच्या ११७ वर्षांच्या इतिहासात अनेक थोर सारस्वतांनी आणि साहित्यप्रेमींनी वाङ्‍‍मय सेवकांची भूमिका पार पाडत या संस्थेला नावारुपाला आणले. त्यांच्या योगदानाचे कृतज्ञतेने स्मरण करण्यात परिषदेला धन्यता वाटते. मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत राहिलेल्या परिषदेचे महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ घडवित साहित्य परिषदेची वाटचाल सुरू आहे.