लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: ‘डीआरडीओ’चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या कोठडीत १६ मेपर्यंत वाढ करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी मंगळवारी दिले.

Rohit Pawar
“पाणी वाटपासाठी महिलांना पैसे दिले” म्हणणाऱ्या रवी राणांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “एवढा खर्च केला असेल, तर…”
shirur lok sabha 2024 marathi news
अमोल कोल्हेंना गावकऱ्यांचा विरोध! आढळराव म्हणाले, “कोल्हेंना तोंड दाखवायला…”
Gosht Punyachi
गोष्ट पुण्याची-भाग १२२ : पुण्यातील ‘पत्र्या मारुती मंदिरा’च्या नावामागची नेमकी गोष्ट काय?
pune tur dal prices marathi news, tur dal price increased in pune marathi news
डाळी कडाडल्या, अवकाळीमुळे उत्पादनात घट; दर १८० ते १८५ रुपयांवर

पाकिस्तानाला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले कुरुलकर यांना सोमवारपर्यंत (१५ मे) एटीएस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायालयाने दिला होता. कुरुलकर यांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी न्यायालयाच्या आवारात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुरुलकर यांना अटक करण्यात आल्यानंतर एटीएसकडून करण्यात आलेल्या तपासाबाबतचा अहवाल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी सादर केला. या प्रकरणाचा सखोल तात्रिक तपास करायचा असून, कुरुलकर यांच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती एटीएसकडून विशेष न्यायालयाकडे करण्यात आली.