या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या करोना विषाणूमुळे अवघा भारत देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाजीचे मार्केट सुरूच आहे. रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे, अश्यात काही तळीराम भाजीच्या नावाखाली गावठी दारू दुचाकीवरून घेऊन जात असताना पिंपरी वाहतूक पोलिसांनी आढळले मग काय पोलिसांनी चोप दिला. एवढेच नव्हे तर त्याच्या तोंडाला मास्क नसल्याने त्याचा शर्ट काढून तोंडाला बांधायला लावला.

पिंपरी-चिंचवड शहरात करोना ने शिरकाव केला आणि १२ जण बाधित आढळले. त्यानंतर प्रशासनाकडून विविध उपाय योजना करण्यात आल्या. देशात जास्त प्रादुर्भाव झाल्याने अवघा देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतु, काही नागरिकांना काही घेणं देणं नसल्याचं समोर येत आहे. काही नागरिक अत्यावश्यक सेवामध्ये असलेल्या भाजी च्या नावाखाली दारूचे व्यसन भागवत असल्याचे दिसत आहे. आज पिंपरी च्या आंबेडकर चौकात दोन व्यक्ती हे दुचाकीवरून जात होते. त्यांना वाहतूक पोलिसांनी अडवले. पोलिसांनी कारण विचारले तेव्हा भाजी घ्यायला गेलो असल्याचे सांगत आपल्याकडील पिशवी दाखवली. मात्र पाठीमागे बसलेल्या व्यक्तीकडे दुसऱ्या पिशवीत गावठी दारू असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांनी काठीने ती बॅग फोडली, त्यात गावठी दारू होती. त्याने मास्क ही बांधले नव्हते त्यामुळे त्याला शर्ट काढायला लावत काठीने चोप दिला आणि शर्ट तोंडाला बांधायला लावला. दरम्यान, नागरिकांनी आपापल्या घरात राहणे बंधनकारक आहे.  परंतु, काही नागरिक अत्यावश्यक सेवांच्या नावांखाली रस्त्यांवर फेरफटका मारत आहेत, तर काही जण आपली व्यसन. त्यामुळे नागरिकांनी करोना विषाणू च गांभीर्य समजून घेत स्वतःला २१ दिवस घरात राहण्याची सवय लावली पाहिजे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drinker fraud in the name of essential services kjp 91 abn
First published on: 25-03-2020 at 23:58 IST