मद्यपी मुलाचा वडिलांनी गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली. मुलाने आईला शिवीगाळ केल्याने वडिलांनी त्याचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
सनी नागसेन घोडके (वय ३७, रा. भाऊ पाटील रस्ता, बोपोडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी वडील नागसेन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी, त्याचे वडील आणि आई बोपोडीत राहायला आहेत. नागसेन मंडप व्यावसायिक आहेत. त्यांचा मुलगा नागसेन काही काम करत नव्हता. त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. नशेत त्याने आईला शिवीगाळ केल्याने नागसेन चिडले होते. नागसेन मृतावस्थेत बोपोडी परिसरात सापडला. सुरुवातीला या प्रकरणी खडकी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती.
पोलिसांनी तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालात सनीचा मृत्यू गळा दाबून करण्यात आल्याचे उघडकीस आले. चौकशीत नागसेन यांनी सनीचा गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद चव्हाण तपास करत आहेत.