लोणावळा : लोणावळा ते पवनानगर दरम्यान जवळचा रस्ता असलेल्या दुधिवरे खिडींचा वापर ग्रामस्थांसह पर्यटक मोठय़ा प्रमाणावर करतात. दुधिवरे खिंडीतील रस्ता धोकादायक झाला असून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. तसेच खड्डय़ातील खडी बाहेर पडल्याने या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.

चार वर्षांपूर्वी दुधिवरे खिंडीतील रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. पाणी साठणाऱ्या भागात काँक्रीटीकरण तसेच डांबरीकरण करण्यात येणार होते. दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले असताना अद्याप दुधिवरे खिंडीतील रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपाययोजना करण्यात येत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांसह पर्यटकांनी केल्या आहेत. रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने या भागातील ग्रामस्थांसह पर्यटकांना जीव मुठीत घेऊन खिंडीतून वाहने न्यावी लागत आहेत.

shocking incident in Wardha bullets fired on cousin
वर्धेत थरकाप उडवणारी घटना, आतेभावावर गोळया झाडल्या
Honey bees attack people while wedding evening due to high volume sound
बुलढाणा : डीजेच्या तालावर वऱ्हाडी बेभान थिरकत होते, अचानक सगळे सैरावैरा पळू लागले…
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना

लोणावळा ते औंढे दरम्यान रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. दुधिवरे खिंडीतील रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठे खड्डे पडले आहेत. एका बाजूला चढ आणि दुसऱ्या बाजूला उतार असल्याने खिंडीतील रस्ता धोकादायक झाला असून या भागात गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा काणाडोळा 

पावसाळा तोंडावर आला असून वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई केली जात नाही. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी दुधिवरे खिंडीतील कामााकडे काणाडोळा केला आहे. पावसाळय़ापूर्वी किमान खिंडीतील खड्डे तरी बुजवावेत. दरवर्षी पावसाळय़ात दुधिवरे खिंडीत दगड, माती ढासळून रस्त्यावर पडले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करून खिंडीतील धोकादायक भागातील दगड, माती काढून टाकावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.