करोना, टाळेबंदीचा परिणाम नोंदणी विवाहांवर झाला असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास आले आहे. टाळेबंदीमुळे मार्चचा निम्मा महिना, एप्रिल आणि मेमधील काही दिवस नोंदणी कार्यालय बंद असल्याने आणि या काळात अनेकांच्या नोकरी, व्यवसायांवर गदा आल्याने नोंदणी विवाहांवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात विवाहासाठी मुहूर्त असल्याने नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी दैनंदिन येणाऱ्या अर्जाची संख्याही वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्रिका आणि मुहूर्त पाहून विवाह करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्याबरोबरच नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. आपल्या सोयीप्रमाणे विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन विवाह केला जातो. या कार्यालयात नोंदणी करून होणारे विवाह विशेष विवाह कायद्यानुसार होतात. त्यामध्ये जात, धर्माचा अडथळा नसतो. विवाहाच्या वेळी किचकट प्रक्रिया नसल्याने व करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विवाह समारंभासाठी उपस्थितांची संख्या नियंत्रित केली आहे. त्यामुळेही नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचे प्रमाण वाढत आहे. २०१९ मध्ये ७०४६ नोंदणी विवाह झाले होते. गेल्या वर्षी ५२२१ विवाह नोंदणी पद्धतीने विवाह केला. टाळेबंदी काळात नोंदणीची संख्या कमी होती. त्यामुळे यंदा नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचे विवाह नोंदणी अधिकारी डी. ए. सातभाई यांनी दिली.

गेल्या दोन वर्षांतील नोंदणी विवाह

महिना  २०१९   २०२०

जानेवारी ५६७ ६८६

फेब्रुवारी ६७० ७३५

एप्रिल   ५८५ ०

मे  ७५१ ८४

जून ६४८ १९९

जुलै    ५३५ ३८३

महिना  २०१९   २०२०

ऑगस्ट ४६६ ४३१

सप्टेंबर ४०० ४२९

ऑक्टोबर   ५०३ ५४४

नोव्हेंबर ६४० ५६२

डिसेंबर  ७४० ८३२

एकूण   ७०४६  ५२२१

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to the lockdown the number of registered marriages decreased by 30 per cent during the year abn
First published on: 28-01-2021 at 00:23 IST