पिंपरी चिंचवड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे सरकार (सत्ता) बदलण्यात एक्सपर्ट आहेत. त्यामुळे हे सरकार पडेल या अफवांवर विश्वास ठेवू नका. पुढील २० वर्ष हे सरकार पडणार नाही असा विश्वास केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामदास आठवले म्हणाले की, हे सरकार काही लवकर जाणार नाही. अनेक जण म्हणत आहेत की हे सरकार जाणार आहे. जाणार असते तर हे सरकार आले असते कशाला? हे सरकार जाण्यासाठी आलेले नाही. हे सरकार पुढील २० वर्ष टिकणार आहे. ह्या सरकार कडून अनेक अपेक्षा आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे सरकार बदलण्यात तज्ञ (एक्सपर्ट) आहेत. त्यामुळे हे सरकार बदलले आहे. आताचे सरकार बदलेल अशी अफवा पसरवली जात आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असे रामदास आठवले म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की, कोणामध्ये नाराजी असण्याच काही कारण नाही. सर्वांना मंत्री पद मिळणार नाहीत. मनात नाराजी असते. प्रत्येकाला वाटतं सत्ता आपल्याला मिळाली पाहिजे पण ती मिळत नाही. मंत्री मंडळ हे ४०-४५ मंत्रीपदांचे असणार आहे. त्यामुळे सर्वांना संधी मिळेल असे नाही. विस्तार झाला की लोकं नाराज होतील आणि सरकार पडेल अशी वलग्ना विरोधकांकडून केली जाईल. 

हेही वाचा: राहुल गांधींकडून समाजात फूट पाडण्याचे काम; रामदास आठवले यांची टीका

पुढे ते म्हणाले की, पत्रकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. बातमी खरी असते पण ती कोणाला तरी टोचणारी असते त्यामुळे अनेक वेळा पत्रकारांवर हल्ले होतात. पत्रकारांचे खून होतात म्हणूनच देवेंद्र फडणवीस ह्यांनी पत्रकारांना संरक्षण देण्याचा कायदा केला आहे. कायद्याने जातीय व्यवस्था संपविण्यात आली आहे. तरी अजून ही दलितांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे कायदे करून चालणार नाही त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. जे अत्याचार करतील त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. यामुळे अत्याचाराची संख्या कमी होऊ शकते असे रामदास आठवले म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde and devendra fadnavis are experts in chnage of government pimpri chinchwad tmb 01 kjp
First published on: 19-11-2022 at 14:59 IST