पुणे : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून इयत्ता पहिली ते बारावीसाठी संपूर्ण अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षाही संपूर्ण अभ्यासक्रमानुसारच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाचा प्रादुर्भाव मार्च २०२० मध्ये सुरू झाल्यानंतर शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू होत्या. तर गेली दोन वर्षे प्रत्यक्ष शाळेत अध्ययन अध्यापन मर्यादित स्वरुपात होत होते. या परिस्थितीत विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी होण्यासाठी २०२०-२१ मध्ये अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२१-२२ मध्येही करोना परिस्थिती कायम राहिल्याने कमी केलेला अभ्यासक्रम २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठीही तसाच ठेवण्यात आला होता.  करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ वमध्ये शाळा नियमित स्वरुपात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता पहिली ते बारावीसाठी पूर्ववत शंभर टक्के अभ्यासक्रम लागू करण्यात आल्याचे शालेय शिक्षण विभागाने घेतला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entire syllabus implemented for class 1 to 12 from the academic year 2022 23 zws
First published on: 24-06-2022 at 20:19 IST