पुणे : अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण आणि औषधनिर्माणशास्त्रासह विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) वाढवली आहे. त्यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

सीईटी  सेलकडून दिवाळीच्या काही दिवस आधी व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. दिवाळीच्या सुटीमुळे महाविद्यालये बंद असल्याने सर्वच विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (कॅप) समुपदेशन मिळाले नाही, तसेच अर्जही दाखल करता आला नाही. तसेच अमरावती जिल्ह्यातील संचारबंदी आणि इंटरनेट सेवा बंद असणे, एसटीच्या संपामुळेही विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढीची मागणी  असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्यूट इन रूरल एरिया या संस्थेने सीईटी सेलकडे केली होती. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने प्रवेशासाठी मुदतवाढीचे परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले.  

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Extension of time for registration of BBA BMS BCA entrance exam
बीबीए, बीएमएस, बीसीए प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… आतापपर्यंत किती अर्ज झाले दाखल?
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
BBA
बीबीए, बीएमएस, बीसीएच्या प्रवेशांचीच परीक्षा… झाले काय?

औषधनिर्माणशास्त्र पदवी आणि पदव्युत्तर पदवीसाठी २३ नोव्हेंबर, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी (बी.ई., बी.टेक.) अभ्यासक्रमांसाठी २१ नोव्हेंबर, वास्तुकला (बी.आर्च, डी.एस.ई) अभ्यासक्रमांसाठी  २० नोव्हेंबर आणि व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए, एमएमएस) अभ्यासक्रमांसाठी २२ नोव्हेंबर अंतिम मुदत आहे.