सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीची एकाने छेड काढल्याची घटना घडली. विद्यार्थिनीने छेड काढणाऱ्या तरुणाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि तरुणाला चोपही दिला.विद्यापीठाच्या आवारातील जयकर ग्रंथालयातील अभ्यासिकेत (रिडींग हॉल) शुक्रवारी विद्यार्थिनी अभ्यास करत होती. त्या वेळी ग्रंथालयात अभ्यास करणाऱ्या तरुणाने तिची छेड काढली.  त्यावेळी ही घटना घडली.

हेही वाचा >>> पुणे : दोन हजार रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबरनंतरही वैध; बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांची स्पष्टोक्ती

mumbai university marathi news
कलिना संकुलातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना बाटलीबंद पाणी, मुंबई विद्यापीठाकडून खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

जयकर ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी नियमित अभ्यास करतात. गेल्या काही दिवसांपासून  तरुण विद्यार्थिनीकडे एकटक पाहून तिला त्रास देत होता. विद्यार्थिनीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, त्यानंतर तरुण विद्यार्थिनीची छेड काढत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. विद्यार्थिनीने छेड काढणाऱ्या तरुणाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याला चोप दिल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षारक्षक तेथे दाखल झाले. दरम्यान, विद्यार्थिनीने अद्याप या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही. चार ते पाच दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या आवारात छेड काढणाऱ्या तरुणाला विद्यार्थिनीने चोप दिल्याची घटना घडली होती.