पिंपरी-चिंचवडमधील भाजपा आमदार महेश लांडगे यांनी करोना नियमांचं उल्लंघन केल्याचं आज माध्यमांद्वारे समोर आल्यानंतर, सर्वसामान्य जनतेत याप्रकरणी पोलीस आता काय कारवाई करतील? नियम फक्त सर्वसामान्यांनाच लागू आहेत का? नेते मंडळींना सर्व काही माफ आहे का? असे विविध प्रश्न चर्चिले जात होते. अखेर सर्वसामान्यांच्या या प्रश्नाला पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईवरून उत्तर मिळालं आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्यासह ६० जणांविरोधीत करोना नियमांची पायलमल्ली केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करोना नियमांकडे दुर्लक्ष करत आमदार महेश लांडगे यांचा कार्यकर्त्यांसह डान्स!

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
dawood ibrahim marathi news, extortion dawood ibrahim marathi news
खंडणीप्रकरणातून दाऊदच्या पुतण्यासह तिघांची निर्दोष सुटका
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा
aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?

आमदार महेश लांडगे यांच्यासह एकूण ६० जणांवर भोसरी पोलीस ठाण्यात करोना नियमांची पायमल्ली केल्याने १८८, २६९ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जमावबंदीचे उल्लंघण याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या मुलीचा ६ जून रोजी विवाह सोहळा असून, त्यापूर्वी काल (रविवारी) झालेल्या मांडव सोहळ्यात त्यांनी कार्यकर्त्यांसह भंडारा उधळून डान्स केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तसेच, यावेळी उपस्थित असलेल्या अनेकांनी मास्क देखील लावला नव्हता. कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तींनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाकडे दुर्लक्ष करत, गर्दी करत जल्लोष केला. तसेच, यावेळी वाजंत्री, बैल जोड्यांच देखील आयोजन करण्यात आलं होतं.