कात्रज येथील मांगडेवाडी परिसरात असणाऱ्या एका फायनान्स कंपनीच्या गोडाऊनला आग लागून ५० दुचाक्या जळून खाक झाल्या आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. अशी माहिती अग्निशामक दलाच्या आधिकाऱ्यांनी दिली.
अग्निशामक दलाच्या आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, कात्रजमधील मांगडेवाडीत हिंदुजा फायनान्स कंपनीचे विजया एंटरप्रायझेस नावाचे गोडाऊन आहे. त्या ठिकाणी हप्ते न भरलेल्या दुचाकी जप्त करून त्या ठिकाणी ठेवल्या जातात. आज सायंकाळच्या सुमारास अचानक गोडाऊन ला आग लागल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या गाड्या काही वेळामध्ये दाखल झाल्या. मात्र तोवर ही आग मोठ्या प्रमाणावर वाढली होती. त्यामुळे बाजूच्या काही दुकानाचे ही नुकसान झाले असून या गोडाऊन मधील तब्बल ५० दुचाकी जळून खाक झाल्या. यामध्ये अंदाजे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 16th Apr 2017 रोजी प्रकाशित
कात्रज येथील गोडाऊनला आग, ५० दुचाक्या जळून खाक
या आगीचे कारण अद्याप समजले नाही

First published on: 16-04-2017 at 22:48 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire in warehouse katraj 30 lakh rupees worth vehicles damaged