मावळमधील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानावेळी मंगळवारी अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात मनसेचे तालुका अध्यक्ष मंगेश ऊर्फ बंटी वाळूंज यांचा मृत्यू झाला. कामशेतमध्ये मंगळवारी सकाळी हा गोळीबार झाला. या गोळीबारानंतर संतप्त जमावाने मावळमधील अनेक मतदान केंद्रांवर तोडफोड केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर या भागातील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे.
गोळीबारानंतर बंटी वाळूंज यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजल्यावर मावळमध्ये संतप्त जमावाने मतदान केंद्रांची तोडफोड केली. त्याचबरोबर अनेक ठिकाणी चारचाकी गाड्या आणि दुकानांवरही दगडफेक केली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Aug 2015 रोजी प्रकाशित
ग्रामपंचायत निवडणुकीवेळी मावळात गोळीबारात एकाचा मृत्यू, जमावाकडून तोडफोड
मावळमधील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानावेळी मंगळवारी अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात मनसेचे तालुका अध्यक्ष बंटी वाळूंज यांचा मृत्यू झाला.
First published on: 04-08-2015 at 04:16 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing in kamshet one person died