पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) प्रस्तावित करण्यात आलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी आनंदऋषीजी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील) दुमजली उड्डाणपुलाचे काम ६ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे.विभागीय आयुक्तालयात पुणे महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुणे युनिफाइड मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट ॲथॉरिटी – पुम्टा) गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुमजली उड्डाणपुलाचे काम करणेसाठी पीएमआरडीएने या बैठकीत नियोजन सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार हे काम नोव्हेंबर २०२४ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

याबाबत बोलताना पीएमआरडीएचे मुख्य अभियंता विवेक खरवडकर म्हणाले, ‘पुम्टाच्या बैठकीत चांदणी चौकातील जुना पूल २ ऑक्टोबरला पाडण्याचे आणि त्यानंतर ५ ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणची वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. त्यानंतरच विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी आवश्यक पाया घेण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच ऑक्टोबर २०२२ ते एप्रिल २०२४ या कालावधीत गणेशखिंड रस्त्यालगत ११ मीटर रुंदीचे अडथळे उभे करून पाया घेण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मे २०२४ नंतर केवळ तीन मीटर रुंदीचे अडथळे उभे करण्याची आवश्यकता राहणार आहे.

Brothers Arrested in for more than 12 Crore Online Ticket Scam of Tadoba Andhari Tiger Reserve
ताडोबा ऑनलाईन तिकीट घोटाळाप्रकरणी ठाकूर बंधुंना अटक; १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Mumbai, nursery,
मुंबई : उच्च न्यायालयातील पाळणाघराला अखेर न्याय
Change in train schedule due to night block at Vikhroli
विक्रोळीतील रात्रकालीन ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
Drain cleaning mumbai
नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला

हेही वाचा : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपच्या सांगण्यावरून…”; NIA च्या छापेमारीनंतर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा आरोप

त्यामुळे वाहतुकीला जास्त अडथळा राहणार नाही.’गणेशखिंड रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक असल्याने या दुमजली पुलाचे काम जानेवारी २०२४ अखेर पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करणे, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ वाढवून कमीत कमी कालावधीत काम करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त आणि पुम्टाचे अध्यक्ष सौरभ राव यांनी पीएमआरडीएला बैठकीत दिल्या. हे काम किमान कालावधीत पूर्ण करण्यासाठीच्या नियोजनाबाबत मेट्रो प्रकल्पाचे स्वतंत्र अभियंत्यांना पुढील सात दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही या वेळी देण्यात आल्या, असेही खरवडकर यांनी सांगितले.

हेही वाचा : दिल्लीत रात्री उशिरा खलबतं! एकनाथ शिंदेंनी रात्री उशिरा घेतली अमित शाहांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?

विविध उपाययोजनांची अंमलबजावणी

पीएमआरडीएकडून वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस विभागास आवश्यकतेनुसार अतिरिक्त वाहतूक नियंत्रक देणे, रस्त्यांवरील खड्डे भरणे, चतुःशृंगी पोलीस चौकीचे फाटक उघडून विद्यापीठामार्गे वाहतूक वळविणे, मॉडर्न महाविद्यालयालगत रस्त्याचे काम करणे आणि त्यामार्गे दुचाकी व तीनचाकी वाहतूक वळविणे प्रस्तावित आहे. पुणे महापालिकेमार्फत गणेशखिंड रस्त्यालगत पदपथाची रुंदी कमी करणे, विद्यापीठ ते वैकुंठ मेहता संस्था दरम्यान तात्पुरता रस्ता करणे आणि या रस्त्याने पुढे रेव्हेन्यू कॉलनी येथे उतार करून भोसलेनगरकडून वाहतूक वळविणे, खडकी स्थानक आणि परिसरातील भुयारी मार्ग व लगतचा रस्ता दुरुस्ती करणे, मॉडर्न महाविद्यालयालगत पाणीपुरवठा वाहिनीचे काम तत्काळ पूर्ण करणे, रस्ता रुंदीकरण, विद्यापीठ चौकात दोन्ही बाजूला रस्ता रुंदीकरणाचे काम पीएमआरडीएकडून पूर्ण करण्यात आले आहे. त्यापैकी एनआयसी संस्थेच्या आवारातील रस्ता रुंदीकरणबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत बैठक घेण्यात येणार आहे.