पुणे : राज्याचे माजी मुख्य सचिव केशव गणेश उर्फ के. जी. परांजपे  (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे आणि मुलगी असा परिवार आहे.

परांजपे यांच्या पार्थिवावर आज, मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या व डोअरस्टेप स्कूलच्या संस्थापक रजनी परांजपे या त्यांच्या पत्नी तर हिंदुस्थान युनिलिव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन परांजपे हे त्यांचे पुत्र होत.

पुणे शहराच्या विकासाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी  के. जी. परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली परांजपे समितीची स्थापना करण्यात आली होती. राज्याच्या मंत्रालयात विविध पदांवर काम केल्यानंतर परांजपे यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली. प्रशासनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना प्रतिष्ठेचा चिन्मुळगुंद पुरस्कारही मिळाला होता.