पुणे : कल्याणीनगर भागातील हाॅटेलच्या गल्ल्यातून चार लाखांची रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत नावरी हलधर सिंग (वय ३८, रा. हरिनगर, वडगाव शेरी-कल्याणीनगर रस्ता) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कल्याणीनगर भागातील काॅर्निच टाॅवर्स इमारतीत बनाना लिफ हाॅटेल आहे. हाॅटेलच्या गल्ल्यात चार लाखांची रोकड ठेवण्यात आली होती. हाॅटेलच्या मागील बाजूस असलेल्या दरवाज्यातून चोरटा आत शिरला. चोरट्याने गल्ला उचकटला. गल्ल्यात ठेवलेली चार लाखांची रोकड चोरुन चोरटा पसार झाला.

हेही वाचा – पुणे : वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार, बोपोडी परिसरातील घटना

हेही वाचा – मालमत्तेसबंधीत टपाल विभागाला ऑनलाईन नोटीस… काय होणार परिणाम ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोकड चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, सहायक निरीक्षक प्रियांका देवकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी हाॅटेलमधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. चित्रीकरणात चोरटा आढळून आला असून, पसार झालेल्या चोरट्याचा माग काढण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक सोळुंके तपास करत आहेत.