पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवार हा आत्महत्या दिवस ठरला, कारण दिवसभरात चार जणांनी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. वाकड पोलिसांनी वेळीच पावलं उचलल्यामुळे पाचवी आत्महत्या झाली नाही. वाकड पोलिसांनी वेळीच जाऊन संबंधित व्यक्तीचे समोपदेशन करत आत्महत्येपासून परावृत्त केले आणि भावाच्या ताब्यात दिले. वाकड पोलिसांचं पिंपरी चिंचवड शहरात कौतुक होत आहे.

सिद्धेश्वर अंपय्या धनगर वय- ३८ असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तीन महिण्यापासून पत्नी मूल हे पुण्यातील घरी राहात असून अनेकदा फोन करून ही येत नसल्याने त्यांनी आज नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचा फोन १०० नंबर ला केला. दिवसभरात आत्महत्या होत असल्याने वाकड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरात ३ तर देहूगाव येथे एका तरुणाने आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपविली आहे. यातील बहुतांश आत्महत्या या नैराश्यातून केल्या असल्याच पोलिसांचं म्हणणं आहे. दरम्यान, सिद्धेश्वर या व्यक्तीने पत्नी आणि मूल हे गेले तीन महिण्यापासुन माहेरी गेले आहेत. फोन करून ही परत येत नसल्याने १०० नंबर (नियंत्रण कक्षाला) फोन करून मी आत्महत्या करणार असल्याचे कळवले. तेव्हा, तातडीने गस्त घालत असलेले पोलीस कर्मचारी बारकुले पोलीस अधिकारी मुदळ यांनी घटनास्थळी जाऊन सिद्धेश्वर ला समजावून सांगितले. त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करत भाऊ कैलास धनगर याच्या स्वाधीन केले. अश्या पद्धतीने आणखी एक आत्महत्या होण्यापासून पोलिसांनी वाचवले.