लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरची शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या बससह तब्बल आठ वाहनांना धडक बसली. या विचित्र अपघातात मोटरसायकलस्वार प्रशांत कृष्णा चौरे (वय ४३, रा. धनकवडी) हे ठार झाले आहेत. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडीमशीन चौकात कोंढवा स्मशानभूमीजवळ गुरुवारी सकाळी हा विचित्र अपघात झाला.

कात्रज कोंढवा रस्त्यावर खडीमशीनच्या दिशेने सिमेंटचे पाईप घेऊन जाणाऱ्या कंटेनरचे ब्रेक निकामी झाले. चालकाला वाहन नियंत्रित न करता आल्याने कंटेनरची पुढे जात असलेल्या आठ वाहनांना धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी आहेत. तसेच अन्य वाहनांचे नुकसान झाले आहे.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मोर्चा! पोलिसांनी अडवला मोर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंटेनरच्या पुढे असणाऱ्या वाहनांमध्ये शाळकरी मुलांची वाहतूक करणारी बस होती. सुदैवाने या बसमधील विद्यार्थी सुरक्षित आहेत. तर चालक किरकोळ जखमी झाला आहे.