scorecardresearch

पुणे : मटार, दोडका, कारली, मिरची, घेवडा, मटार, कैरीच्या दरात वाढ

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (१९ मार्च) राज्य तसेच परराज्यांतून ९० ते ९५ ट्रक फळभाज्यांची आवक झाली.

fruits and vegetables supply at the wholesale market in the market
( Image – लोकसत्ता टीम )

मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या अल्पशी वाढली आहे. मागणी वाढल्याने मटार, दोडका, कारली, हिरवी मिरची, घेवडा, मटार, कैरीच्या दरात वाढ झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (१९ मार्च) राज्य तसेच परराज्यांतून ९० ते ९५ ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटकमधून मिळून ७ ते ८ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, राजस्थानातून ४ ते ५ टेम्पो गाजर, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, पंजाबमधून २ टेम्पो मटार, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, कर्नाटकातून मिळून तोतापुरी कैरी २ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १० ते १२ ट्रक लसूण, आग्रा, इंदूर तसेच पुणे विभागातून मिळून ५० ते ५५ ट्रक बटाटा आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा >>> पुणे : रेल्वेत हिंदीचाच हट्ट ; अधिकारी, कर्मचाऱ्यांना वापर वाढवण्याचा सूचना

पुणे विभागातून सातारी आले ११०० ते १२०० गोणी, टोमॅटो १० ते १२ हजार पेटी, भेंडी ४ ते ५ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, फ्लाॅवर १० ते १२ टेम्पो, कोबी ७ ते ८ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो , कांदा ७० ते ७५ ट्रक अशी आवक झाली.

मेथी, शेपू, चाकवत, पुदिना, अंबाडीच्या दरात घट

मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाली आहे. मेथी, शेपू, चाकवत, पुदिना, अंबाडी या पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे. कांदापात, करडई, मुळा, पालकाच्या दरात घट झाली आहे. राजगिरा, चुका, चवळईचे दर स्थिर आहेत. बाजारात कोथिंबिरीच्या एक लाख २५ हजार जुडींची आवक झाली. मेथीच्या ७० हजार जुडींची आवक झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात मेथी, शेपू, चाकवत, पुदिना, अंबाडीच्या जुडीमागे एक रुपयांनी वाढ झाली आहे. कांदापात, करडई, मुळा, पालकाच्या दरात जुडीमागे एक रुपयांनी घट झाली आहे.

कलिंगड, खरबूज, पपई, संत्री महाग

घाऊक फळबाजारात कलिंगड, खरबूज, पपई, संत्र्यांच्या दरात वाढ झाली आहे. डाळिंब, चिकूच्या दरात घट झाली असून मोसंबी, अननस, पेरु, लिंबू, द्राक्षांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात संत्री ३५ ते ४० टन, मोसंबी ३० ते ४० टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई १० ते १५ टेम्पो, लिंबे दीड हजार गोणी, कलिंगड ३० ते ३५ टेम्पो, खरबूज १५ ते २० टेम्पाे, पेरु २० ते २५ प्लास्टिक जाळी (क्रेट्स), चिकू एक ते दीड टन अशी आवक झाली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 17:03 IST