गुंड शरद मोहोळ याचा करणारे विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे दोन मुख्य सूत्रधार आहेत. शेलार आणि मारणे यांनी मोहोळचा खुनाचा कट रचल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी मंगळवारी न्यायालयात दिली. शरद मोहोळ खून प्रकरणात विठ्ठल महादेव शेलार (वय ३६), रामदास उर्फ वाघ्या नानासाहेब मारणे (वय ३६, दोघेही रा. मुळाशी) यांना अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. शेलार आणि मारणे यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी दिले. रा मुख्य मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणे पसार झाला असून त्याच्या मागावर पोलिसांची पथके आहेत, अशी माहिती न्यायालयात देण्यात आली.

हेही वाचा >>> लोणावळ्यातील हॉटेल मॅनेजिंग डायरेक्टरने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग; गुन्हा दाखल

साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी ५ जानेवारी रोजी मोहोळचा कोथरुडमधील सुतारदरा भागात पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला होता. याप्रकरणात आतापर्यंत १५ आरोपीना अटक करण्यात आली आहे, तसेच आठ ते नऊजणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहोळचा खूनापूर्वी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांची बैठक झाली होती. शेलारविरुद्ध खून, खंडणी, अपहरण असे गंभीर स्वरुपाचे१७ गुन्हे दाखल आहेत. वाघ्या मारणे सराइत गुन्हेगार आहे. शेलार आणि मारणे कोठे भेटले, त्यावेळी कोण उपस्थित होते, यादृष्टीने तपास करायचा आहे, असे तपासअधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी सांगितले. शेलार आणि मारणे यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील ॲड. नीलिमा इथापे-यादव यांनी केली. फिर्यादीच्या वतीने ॲड. गोपाळ भोसले यांनी बाजू मांडली. आरोपींच्या वतीने ॲड. डी. एस. भोईटे आणि लोक अभिरक्षक कार्यालयाच्या ॲड. रोहिणी लांघे यांनी बाजू मांडली. शेलारची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. मोहोळच्या खुनानंतर शेलारला पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले होते. त्यावेळी शेलार चौकशीसाठी हजर झाला होता. या गुन्हयात मोक्का कारवाई करण्याची असल्याने शेलारला आरोपी करण्यात आले आहे, असे ॲड. भोईटे यांनी युक्तीवादात सांगितले. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून न्यायालायने शेलार आणि मारणे यांना पाच दिवस पोलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले.