पिंपरी- चिंचवड: दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णीने निगडी येथी निवस्थानी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठपणा केली आहे.  गजमुख असलेल्या पर्यावरणपूरक गणपती बाप्पांची मूर्ती लक्ष वेधून घेते. “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्राची संस्कृती, राजकीय आणि सामाजिक परिस्थितीसाठी कायमस्वरूपी एकत्र यावं”, अस मत व्यक्त केलं आहे.

सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी बाप्पाचं जल्लोषात आगमन झालं आहे. सहा वर्षांपासून सोनाली इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करते. हे त्यांचं सातवं वर्ष असून, या वर्षी त्यांनी गजमुख रूपातील (गणेशमूर्ती) साकारली आहे. सोनाली खास गणपतीनिमित्त सुट्टी काढून निगडी येथील निवासस्थानी येते. त्यानिमित्तानं त्यांचं अख्ख कुटुंब एकत्र दिसतं.

“राज्यातील रस्ते खड्डेमुक्त व्हावेत, अस साकडं तिनं गणपती बाप्पाच्या चरणी घातलं आहे.” सोनालीनं,”हिंदी व मराठीवरून जातिवाद आणि प्रांतवाद होऊ नये. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय परिस्थितीसाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी कायमस्वरूपी एकत्र यावं, असं मत तिनं व्यक्त केलं आहे. आतापर्यंत शंकर, बालगणेश व तुकोबांचं रूप गणेशमूर्तीच्या माध्यमातून तिनं साकारलं. गजमुख रूपातील बाप्पा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.