महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या गीतरामायणाला ६० वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त गरवारे महाविद्यालयाच्या पटांगणावर २६ ते २८ मार्च दरम्यान सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत गीतरामायण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके  यांच्या हस्ते होणार आहे. ‘पृथ्वी एडिफीस’ हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.
हा कार्यक्रम उद्घाटनाच्या दिवशी मराठीत होणार आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांत तो संस्कृत, हिंदी, गुजराती व जर्मन भाषांमध्ये देखील होणार आहे. आकाशवाणीचा सत्कार, गौरव अंकाचे प्रकाशन, गदिमांचे भाषण, बाबूजींनी (सुधीर फडके) गायलेले गीतरामायण व अन्य कार्यक्रमांच्या एकत्रित डीव्हीडीचे प्रकाशन असे कार्यक्रम या महोत्सवात होणार आहेत. या महोत्सवाची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमासाठी ६०० व ३०० रुपये असे तिकिट ठेवण्यात आले आहे. तिकिट विक्री बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, टिळक स्मारक रंगमंदिर, अण्णा भाऊ साठे नाटय़गृह आणि ग्राहक पेठ टिळक रोड व बिबवेवाडी येथे सुरु आहे.

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
students clashed again in pune university premises
पुन्हा विद्यार्थी भिडले! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात पुन्हा हाणामारी….