‘पुष्पा’ चित्रपटामधील गाणी, डायलॉग आज ही चर्चेत असून या चित्रपटातील (श्रीवल्ली) हिरोईनसारखी दिसतेस असे म्हणत, पुण्यातील धनकवडी परिसरातील दोघांनी एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोहेल आणि आरबाज (वय अंदाजे २५, पूर्ण नाव माहिती नाही) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडी परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास पीडित तरुणी घराजवळ थांबली होती. तेव्हा आरोपी सोहेलने शिट्ट्या वाजवल्या आणि पीडित तरुणीकडे पाहून म्हणाला की, पुष्पा चित्रपटातील हिरोईन सारखी दिसतेस, मला तुझ्यासोबत लग्न करायच आहे. आणि त्याने तिला मिठी मारली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


त्यावर तिने आरडाओरड केल्यावर,तिथे तिचा भाऊ आला. दोन्ही आरोपींनी त्याला देखील मारहाण आणि शिवीगाळ केली आणि तेथून पसार झाले. या प्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांकडे तक्रार देताच, आरोपी सोहेल आणि आरबाज यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.