भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, चांदीचे पूजा साहित्य असा दहा लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना येरवडा भागातील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरात घडली.  याबाबत एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सदनिका बंद करुन त्या कामानिमित्त सकाळी साडेअकराच्या सुमारास बाहेर पडल्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील सोन्याचे दागिने आणि चांदीचे पूजा साहित्य असा दहा लाख साडेचार हजार रुपयांचा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold ornaments silver articles worth rs 10 lakh stolen in yerawada area pune print news zws
First published on: 12-10-2022 at 19:51 IST