पुणे : बाजारपेठेत आवक वाढल्याने बहुतांश पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत. मेथी, शेपू, चाकवत, पुदिना, मुळा, चवळई, हरभरा गड्डी या पालेभाज्यांच्या दरात घट झाली. कोथिंबीर, कांदापात, करडई, अंबाडी, राजगिरा, चुका आणि पालक या पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत.

मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीच्या पावणेदोन लाख जुडी, मेथीच्या एक लाख जुडी, हरभरा ४ ते ५ हजार जुडी अशी आवक झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात चाकवत, मुळ्याच्या जुडीमागे प्रत्येकी ३ रुपयांनी घट झाली. हरभरा गड्डीच्या दरात २ रुपयांनी घट झाली. मेथी, शेपू, पुदिना, चवळईच्या जुडीमागे १ रुपयांनी घट झाली. घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांच्या जुडीचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- ५०० ते १२०० रुपये, मेथी- ४०० ते ७०० रुपये, शेपू- ४०० ते ७०० रुपये, कांदापात- ६०० ते १००० रुपये, चाकवत- ३०० ते ७०० रुपये, करडई- ४०० ते ७०० रुपये, पुदिना- ३०० ते ७०० रुपये, अंबाडी- ४०० ते ७०० रुपये, मुळा- ६०० ते १२०० रुपये, राजगिरा- ४०० ते ७०० रुपये, चुका – ४०० ते ८००, चवळई- ३०० ते ६०० रुपये, पालक- ६०० ते १२०० रुपये, हरभरा गड्डी- ५०० ते १००० रुपये.

life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
Increase in prices of fruits and vegetables due to decrease in arrivals
खिशावर आर्थिक ताण; पालेभाज्या, फळभाज्यांच्या दरात वाढ
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा
Navi Mumbai Traffic congestion
नवी मुंबई : सलग सुट्ट्या आणि मेळाव्याने एपीएमसी परिसरात वाहतूक कोंडी

हेही वाचा – पुणे : हिंजवडीत महिलेची गोळ्या झाडून हत्या; संशयित आरोपी ताब्यात, प्रियकर की पती-पत्नी? पोलीस घेत आहेत शोध

हेही वाचा – पुणे : कोयत्याच्या धाकाने डिलिव्हरी बॉयला लुटले

लसूण, टोमॅटो, ढोबळी मिरची, घेवड्याच्या दरात वाढ

घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. लसूण, टोमॅटो, ढोबळी मिरची, घेवड्याच्या दरात वाढ झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.