scorecardresearch

पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम आता ऑनलाइन शिकण्याची संधी

सिम्बी ऑनलाइन या  अ‍ॅपद्वारे घरबसल्या अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते सिम्बी ऑनलाइनचे उद्घाटन

पुणे : सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकता येणार आहेत. सिम्बी ऑनलाइन या  अ‍ॅपद्वारे घरबसल्या अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठातर्फे गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते सिम्बी ऑनलाइन या अ‍ॅपचे उद्घाटन झाले. विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, विद्यापीठाच्या प्र कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार आदी या वेळी उपस्थित होते. या उपक्रमाअंतर्गत मराठी आणि इंग्रजी माध्यमातून कला पदवी, वाणिज्य पदवी, संगणकशास्त्र पदवी, व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासाठी शिक्षकांची व्याख्याने, सर्व आवश्यक शैक्षणिक साहित्य अ‍ॅपद्वारे मिळतील.

ऑनलाइन शिक्षण ही उच्च शिक्षणातील क्रांती आहे. या क्रांतीमुळे प्रत्येकाला शिकण्याची संधी मिळणार असल्याचे डॉ. मुजुमदार यांनी सांगितले. तर ग्रामीण भागातील आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना चांगली शैक्षणिक साधने उपलब्ध होत नाहीत. मात्र आता जवळपास सर्व विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन असतात. त्यामुळे या स्मार्टफोनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देण्याच्या उद्देशाने सिम्बी ऑनलाइनची सुरुवात केल्याचे डॉ. स्वाती मुजुमदार यांनी नमूद केले.

कलेच्या क्षेत्रात दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. सुख-दु:खाची व्याख्या बदलत नसेल तर नट होण्याचा अधिकार नाही.  आपण नुसतेच असण्यापेक्षा आपले असणे आपल्या वागणुकीतून दिसले पाहिजे. रोज स्वत:शी स्पर्धा करायला हवी. आयुष्याचा ताल सांभाळला की खूप गोष्टी सोप्या होतात. माणसामाणसातील भिंती तोडल्या पाहिजेत. सरकारी अर्जावरचे जातीधर्माचे रकाने काढले पाहिजेत. चित्रपटसृष्टीत गुणवत्ता हीच जात धर्म आहे. – नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेते

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Graduate undergraduate courses are now an opportunity to learn online zws

ताज्या बातम्या