पुणे प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात त्याच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. त्याच दरम्यान अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पुण्यातील पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आणि चिंतामणी ज्ञानपीठाच्या संयुक्त विद्यमाने उद्या सोमवार ३ जुलै रोजी गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूजन गौरव सोहळयाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार का अशी चर्चा सुरू होती.
त्याच दरम्यान कार्यक्रमाचे आयोजक म्हणाले की, गणेश कला क्रिडा रंगमंच येथे उद्या सकाळी ९.३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार होता. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमात रद्द करण्यात आला असून शनिवार दिनांक ८ जुलै २०२३ रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा-पवारांचे विश्वासू दिलीप वळसे पाटील अजितदादांसमवेत खासदार अमोल कोल्हे गेल्याने शरद पवार यांना धक्का
गुरूजन गौरव सोहळ्याचे हे १८ वे वर्ष आहे. यावर्षी ज्येष्ठ कला दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, माजी आमदार उल्हास पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ, ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे अध्यक्ष रमणलाल लुंकड या गुरूजनांचा सन्मान करण्यात येणार होता.