आरोपी तरुणी आणि तरुण दोघे ही जिम ट्रेनर आहेत

पिंपरी- चिंचवड: जिम ट्रेनर तरुणी आणि तरुणाने एकाची लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून हत्या केली आहे. ही घटना दुपारी घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी जिम ट्रेनर प्रांजल तावरे आणि यश पाटोळे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्या केल्याची कबुली दिली. याप्रकरणी दोघांना दिघी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

लल्ला उर्फ गोपीनाथ वरपे अस हत्या झालेल्या तरुणाच नाव आहे. पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिम ट्रेनर आरोपी प्रांजल आणि यश पाटोळे यांचं दोघांमध्ये चऱ्होली येथे प्रोटीन पावडरच दुकान आहे. आज दुपारी हत्या झालेला लल्ला वरपे तिथे आला. तो प्रांजल ला अश्लीलरित्या बोलत होता. दोघांमध्ये शाब्दीक वाद ही झाला. लल्लाने शिवीगाळ केली, यावरून प्रांजल तावरे आणि यश पाटोळे यांनी पहार आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.

घटनेनंतर दोघांनी थेट दिघी पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली. तोपर्यंत लल्लाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला होता. झटापटीत दोघे ही किरकोळ जखमी झाले आहेत. प्रांजल आणि यश पाटोळे दोघे ही जिम ट्रेनर आहेत. त्यांची लल्लासोबत आधीपासून ओळख असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.