पुणे : दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुण्याला शुक्रवारी झोडपले. जोरदार झालेल्या पावसामुळे शहर व उपनगरांमधील सखल भागात पाणी साचले होते. परिणामी वाहतुकीचा बोजवारा उडाला. शहरातील मध्यभागासह सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, बावधन, पाषाणा, औंध, मगरपट्टा, नगररस्ता, कोंढवा, शिवाजीनगर आदी भागात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचून प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. हवामान विभागाकडून शहर व परिसरात पुढील दोन दिवस पिवळा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस अशाच प्रकारच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> पुणे : तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीचा प्रश्न लवकरच निकाली; प्रमाणभूत क्षेत्रात बदल प्रस्तावित

हेही वाचा >>> पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?

मोसमी पाऊस यंदा लांबला असून तो महाराष्ट्रातून पुढील दोन दिवसांत पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तामिळनाडूपासून राजस्थानपर्यंत तयार झालेल्या द्रोणीय रेषेमुळे राज्यात मोसमी पाऊस अद्यापही सक्रिय असून कोकणासह मध्य महाराष्ट्रात शनिवारपर्यंत पाऊस कायम राहणार आहे. त्यानंतर मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> पुणे : तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीचा प्रश्न लवकरच निकाली; प्रमाणभूत क्षेत्रात बदल प्रस्तावित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साठल्याने वाहतुकीचा वेग संथ झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. शहरात शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी तीननंतर मुसळधार पावसास सुरुवात झाली. तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साठले. पाणी साठल्याने वाहतूक विस्कळीत झाले. फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, गणेशखिंड रस्ता, कर्वे रस्ता, शास्त्री रस्ता, नगर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, सिंहगड रस्ता, शंकरशेठ रस्ता या रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली. शहरातील बहुतांश रस्त्यांवर पाणी साठले होते. पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यांवर गुडघाभर पाणी होते. पाणी साठल्याने वाहतुकीचा वेग संथ झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुसळधार पावसामुळे धानोरी आणि कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर झाडे काेसळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडांच्या फांद्या हटवून रस्ता वाहतुकीस खुला करुन दिला. अग्निशमन दलाकडे झाडे पडण्याच्या दोन घटनांची नोंद करण्यात आली. मात्र, शहरात कोठेही पाणी शिरले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.