पुणे : Maharashtra Weather Forecast मुंबई, ठाणे, पुण्याच्या घाट परिसरासह उत्तर महाराष्ट्रात शनिवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र, राज्याच्या उर्वरित भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचे क्षेत्र पूर्व मध्य प्रदेशावर आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिकसह ठाणे, पालघर, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, पुणे, विदर्भातील वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्हेवगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.

पूर्व विदर्भात मुसळधार

पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी सकाळी आठला संपलेल्या २४ तासांत गोंदियात ११५, नागपुरात २१.४, गडचिरोलीत २८.६, चंद्रपुरात २५, बुलडाण्यात १५ आणि अकोल्यात १५.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. किनारपट्टी, मराठावाडा आणि मध्य महाराष्ट्रात उघडीप होती. जळगावात ११.५ मिमी पाऊस झाला. सांताक्रुझमध्ये ५५.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

heatwave three days maharashtra marathi news, heatwave in maharashtra marathi news, heatwave maharashtra marathi news
तीन दिवस उष्णतेच्या लाटेचे; जाणून घ्या मुंबईसह मध्य महाराष्ट्रात काय होणार?
chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
All the four Municipal Corporations like Mumbai Thane Pune Nagpur have emphasized on public awareness to increase the voter turnout in metropolitan cities
मतटक्का वाढवण्याचे लक्ष्य; आयोगाला मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरबाबत चिंता; जनजागृतीवर भर
Meteorological department predicted heat wave in Raigad Thane Palghar along with Mumbai Pune
मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये उकाडा वाढणार; यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात तीन दिवस उष्णतेची लाट