धूम्रपान करणे हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. हल्लीच्या काळात धूम्रपानाच्या गर्तेत अडकलेले अनेक लोक आपण बघितलेत. यासोबतच असेही लोक असतात, ज्यांना धूम्रपानापासून मुक्ती मिळवायची असून सुद्धा ही सवय ते सोडू शकत नाहीत. मात्र टार आणि निकोटिन हे घटक असलेल्या सिगारेटला आता हर्बल सिगारेटचा पर्याय उपलब्ध आहे.

तसं बघायला गेलं तर, आयुर्वेदात धुमपनाला फार महत्त्व देण्यात आले आहे, असं पुण्यातील एक आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. राजस नित्सुरे सांगतात. या धुमापानाला एक वेगळं स्वरूप देऊन त्यांनी लोकांसाठी हर्बल सिगारेट तयार केली आहे. खरंतर या हर्बल सिगारेटची सुरुवात डॉ. राजस नित्सुरे यांच्या आजोबांनी म्हणजे वैद्य अनंत नित्सुरे यांनी केली होती.

डॉ. राजस नित्सुरे यांनी पुढे विविध प्रकारचे वनस्पतींचा अभ्यास करून, त्यांची सखोल माहिती घेऊन, संशोधन करून  एक आयुर्वेदिक सिगारेट बाजारात आणली आहे. ही सिगारेट पूर्णतः वनस्पतींपासून बनवलेली असून यात निकोटीन आणि तंबाखू यांचा थोडासुद्धा वापर केलेला नाही. म्हणजे या निकोटीन आणि तंबाखू विरहित सिगरेट आहेत. या आयुर्वेदिक सिगारेट ‘मारुक’ सोबतच त्यांनी आयुर्वेदिक बिडी ‘टेंबुरीनी’ आणि आयुर्वेदिक ‘गुडका’ तयार केला आहे. हा गुडका म्हणजे बाजारात उपलब्ध असलेल्या हानिकारक गुटक्याला एक उत्तम https://youtu.be/S6URSDMcQEwपर्याय आहे, जो शरीरासाठी अजिबात हानिकारक नाही.https://youtu.be/S6URSDMcQEw

पाहा व्हिडीओ –

हर्बल सिगारेटचा हा प्रवास तीन पिढ्यांपासून चालत आलेला आहे, साधारण ५० वर्षांच्या अथक प्रयत्नांना २०२१ मध्ये यश आलं. आयुर्वेदिक सिगारेट आणि ती बनवण्याच्या प्रक्रियेला २०२१ मध्ये पेटंट प्राप्त झाले.