दोघांनी केली होती हॉटेल मालकाला शिवीगाळ

पुण्यातील मावळमध्ये हॉटेल मालकाने ग्राहकाची हत्या केली आहे. प्रसाद उर्फ किरण अशोक पवार अस हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. घटने प्रकरणी हॉटेल मालक अक्षय येवलेला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. हत्या झालेल्या प्रसाद अशोक पवार आणि अभिषेक अशोक येवले यांचे हॉटेलमधील वेटर सोबत वाद झाले होते.

हेही वाचा >>> आमदार होताच कार्यकर्त्यांनी घेतला ‘हा ‘ मोठा निर्णय ! नवनिर्वाचित आमदारांच्या शुभेच्छांचे शहरभर फलक, प्रशासनाकडून कारवाईचा फक्त देखावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळच्या इंदोरीमधील हॉटेल जय मल्हार येथे रात्री पावणे दहा च्या सुमारास हत्या झालेला प्रसाद अशोक पवार आणि त्याचा मित्र अभिषेक अशोक येवले यांनी जय मल्हार हॉटेल मधील वेटर ला मारहाण केली. वेटर ने हॉटेल मालक  अक्षय येवलेला फोन केला. प्रसाद आणि अभिषेक दोघे ही हॉटेल मालकाचे मित्र असल्याने त्यांनी भांडण करू नका, मी तिकडे येत आहे. असं सांगितलं. फोनवरच दोघांनी हॉटेल मालकाला शिवीगाळ केली. मग तिथून दोघे ही निघून गेले. 

हेही वाचा >>> आमदारकीसाठी महायुतीत पुन्हा चढाओढ, नक्की काय आहे प्रकार ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही वेळाने कोयता घेऊन हॉटेल समोर आले. हॉटेल मालक आरोपी अक्षय येवले हा हॉटेल बंद करत होता. तेव्हा, दोघांनी अक्षय सोबत वाद घातला. अक्षय येवले याने त्यांच्याच हातातील कोयता घेऊन दोघांवर वार केले. गंभीर जखमी असलेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. पैकी, प्रसाद उर्फ किरण अशोक पवार याचा मृत्यू झाला आहे. अभिषेक अशोक येवले हा जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटने प्रकरणी अक्षय येवले याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.