तू काळी आहेस, असे टोमणे मारून चारित्र्यावर संशय घेत सुनेचा सासरच्यांनी मानसिक आणि शारीरिक छळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पतीने केलेल्या मारहाणीत गर्भपात झाल्याचे महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पतीसह सासू, नणंद आणि चुलत सासरे यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय महिलेचा २०१७ मध्ये निलेश संगम याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांचा संसार सुखात सुरु होता. मात्र, काही दिवसांनी सासरच्या मंडळींकडून छळ सुरु झाला. ‘तू काळी आहेस’, असे टोमणे सासू, चुलत सासरे, नणंद आणि पती तिला मारत होते. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन माहेरुन दोन लाख रुपये घेऊन ये, अस म्हणत पती तिला नेहमी मारहाण करायचा. पत्नीने माहेरुन पैसे आणले नाहीत म्हणून निलेशने पत्नीला बेदम मारहाण केली. तसेच तिला भिंतीवर ढकलून दिले. यात पत्नीच्या पोटाला मार लागून तिचा गर्भपात झाला. याप्रकरणी पती निलेश संगम,सासू विमल संगम,नंदन सरिता संगम,चुलत सासरे बलराज संगम यांच्याविरोधात सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने हे करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband father in law booked in harassment in sangvi
First published on: 20-02-2019 at 12:17 IST