पुण्यातील वानवडी परिसरात राहणार्‍या पतीने बायकोच्या आजारपणाला कंटाळून पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. देविंदर कौर बिंद्रा (६६) असं मयत महिलेचं नाव आहे. तर हरविंदर सिंग बिंद्रा (७८) असं आरोपी पतीचं नाव आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वानवडी बाजार चौकीमधील फ्लॉवर व्हॅली लोटस बिल्डिंग सोसायटीमध्ये फ्लॅट नंबर १०२ मध्ये देविंदर कौर बिंद्रा आणि हरविंदर सिंग बिंद्रा हे दोघे पती, पत्नी राहत होते. पत्नी देविंदर कौर बिंद्रा या नेहमी आजारी असत. अखेर सततच्या आजारपणाला कंटाळून हरविंदर यांनी चाकूने गळा कापून पत्नी देविंदर कौर बिंद्राची हत्या केली”.

त्यानंतर हरविंदर यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ‘देविंदर कौर सतत आजारी असल्याने सांभाळू शकत नाही. मी स्वतः तिची हत्या केली असून यासाठी अन्य कोणालाही जबाबदार धरू नये”, असं चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं. हरविंदर यांनी आपणही आत्महत्या करणार असल्याचं पुढे नमूद केलं होतं. यानंतर हरविंदर पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband killed wife in pune sgy
First published on: 02-08-2019 at 14:10 IST