राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानाचा उल्लेख करत आपण दिल्लीच्या संसदेत जाण्यास घाबरत असल्याचं म्हटलं आहे. पुण्यात नुकतंच पार पडलेल्या जागतिक मराठी संमेलनाच्या कार्यक्रमात शरद पवारांनी हे विधान केलं आहे. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी सुशीलकुमार शिंदे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं.

यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी “मी शरद पवार यांच्या तालमीत तयार झालो” असं विधान केलं. याच विधानावरून शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना अप्रत्यक्ष टोला लगावला. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या एका विधानाचा उल्लेखही केला.

Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

हेही वाचा- ‘शरद पवारांच्या तालमीत तयार झालोय’ असं सुशीलकुमार शिंदे म्हणताच शरद पवार म्हणाले “मला भीती वाटतेय…”

शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले, “आता बोलता-बोलता सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, ‘मी शरद पवारांच्या तालमीत तयार झालो आहे.’ पण असं कुणीतरी म्हटलं की मला भयंकर भीती वाटते. कारण याआधी कोणीतरी म्हटलं होतं की, मी शरद पवार यांचं बोट धरून राजकारणात आलोय. तेव्हापासून मी दिल्लीच्या संसदेत जाण्यासाठी घाबरतो,” असं विधान शरद पवारांनी केलं आहे. शरद पवारांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता हा टोला लगावला आहे. ते पिंपरी येथे आयोजित केलेल्या जागतिक मराठी संमेलनात बोलत होते.

हेही वाचा- विधान परिषद निवडणूक: बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीस सरकारला धक्का, विश्वासात न घेतल्याने उचललं मोठं पाऊल

यावेळी जेष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना जागतिक मराठी पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. पी. डी. पाटील, संमेलनाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, सुशीलकुमार शिंदे, अभिनेते सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, खासदार श्रीनिवास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.