२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष निवडणूक स्वतंत्र लढले होते आणि निवडणुकीनंतर काय परिस्थिती झाली होती. हे सगळ्यांच्या समोर आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बेरीज १४५ होत होती.
त्यामुळे २०१४ ला असे सरकार बनवण्यासाठी कोण कोणाला भेटले, याबद्दल मी काही बोलणार नाही किंवा कोणाचं नाव देखील घेणार नाही. मात्र त्यावेळी शिवसेनेसोबत सरकार बनविण्याचा प्रस्ताव होता. हे विधान मी केले असून त्यावर मी आज देखील ठाम असल्याची भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.
शिवसेनेसोबत सरकार बनविण्याचा प्रस्ताव दिला होता. त्या विधानावरून चर्चा सुरू झाली आहे. त्या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिका मांडली. तसेच यावेळी अनेक मुद्यावर भाष्य देखील त्यांनी केले.
पुण्यात नाईट लाईफ सुरू करण्याबाबत प्रश्न विचारला असता त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, नाईट लाईफ सारखी धोरणे राबवताना पोलिसांना खूप त्रास होतो, त्यामुळे पहिल्यांदा मुंबईमध्ये, हे धोरण यशस्वी होते का पाहून पुण्यात ते राबवण्याचा निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यावर ते म्हणाले की, मंत्रिमंडळात सहभागी व्हायला आवडले असते, पण तरुणांना पक्षांनी संधी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.