पुण्यातील मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीच्या प्रतिकृतीची जर्मनीमधील म्युनिक येथील महाराष्ट्र मंडळात प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळे तुळशीबाग गणपती आता सातासमुद्रापार जाणार आहे. रांध्याच्या पर्यावरणपूरक साधनांपासून युवा शिल्पकार विपुल खटावकर यांनी साकारलेली ही गणेश मूर्ती जर्मनीतील संस्थेचे प्रतिनिधी अद्वैत खरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

हेही वाचा >>> अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा संगणकाधिष्ठित अभ्यासक्रमांकडेच कल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, गणेश रामलिंग, कोषाध्यक्ष नितीन पंडित, स्वप्नाली पंडित, शिल्पकार विवेक खटावकर, सागर पेद्दी या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र मंडळ म्युनिक आणि तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या वार्षिक गणेशोत्सवामध्ये या मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना महाराष्ट्र मंडळाच्या विविध सांस्कृतिक उपक्रमांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत देणे, मंडळाच्या ‘मायमराठी’ उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके आणि म्युनिकमध्ये येणाऱ्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आर्थिक किंवा अन्य सहाय्य करणे, मंडळाच्या पालवी दिवाळी अंकाला सहाय्य करण्याचे निश्चित झाले आहे.