भोसरीत प्रेम प्रकरणातून एका तरूणाने आत्याच्या मुलीवर ब्लेडने वार केल्याची घटना समोर आली आहे. यात महिला किरकोळ जखमी झाली असून हल्लेखोर तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास भोसरी येथे घडली. हल्ला करणाऱ्या तरूणाचे नाव दीपक गायकवाड असे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दीपक गायकवाड (वय २५, रा. भोसरी, चिंचवड) व त्याच्या आत्याची मुलगी स्वप्नाली गायकवाड (वय २५, रा. बालाजी नगर, भोसरी) यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेम प्रकरण होते. स्वप्नालीचा विवाह झाला असून तिला दोन मुलं आहेत. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास दीपक स्वप्नालीला भेटायला बालाजी नगर येथे गेला होता. त्यावेळी स्वप्नालीने दीपकला यापुढे मला भेटत जाऊ नकोस असं बजावल. यामुळे दीपक आणि स्वप्नाली यांच्यात वाद झाला. याच रागातून दीपकने स्वप्नालीवर ब्लेडने वार केले. यामध्ये स्वप्नाली जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपक हा एका कंपनीत कामाला असून तो बालाजी नगरपासून काही अंतरावरच राहतो. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In love affair youth attacked on girls in bhosari
First published on: 23-11-2017 at 11:20 IST